घरविशेष‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण पार्ट १’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट गुरुवारी अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी देशभरातील २५ हजार २०० शोमधून या चित्रपटाने ६४.८५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई ६४.८५ कोटी रुपये, तर एकूण ढोबळ कमाई ७७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने १५५ कोटींची कमाई केली आहे.

‘रामायण’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईत हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा आहे. हिंदी भाषेतील २० हजार ६७८ शोमधून चित्रपटाने ४७.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर कन्नड आवृत्तीने १ हजार १९७ शोमधून ७.२५ कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीने १ हजार ७७६ शोमधून ६ कोटी रुपयांची कमाई केली. तमिळ आवृत्तीने ९९२ शोमधून २.६० कोटी रुपये, तर मल्याळम आवृत्तीने ५५७ शोमधून १.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

चित्रपटाच्या हिंदी ३डी आवृत्तीला पहिल्या दिवशी एकूण ३३.९६ टक्के प्रेक्षक उपस्थिती नोंदवण्यात आली. तर २डी आवृत्तीची प्रेक्षक उपस्थिती २७.७९ टक्के होती. गुरुवारी कामकाजाचा दिवस असल्यामुळे प्रेक्षकांची उपस्थिती तुलनेने मर्यादित राहिल्याचे मानले जात आहे. मात्र, आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असल्याने आगामी दिवसांत चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची संख्या आणि कमाई वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

फटाक्यांचे अनधिकृत स्टॉल,दादरच्या सुरक्षेशी खेळ!

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या

विश्वचषकापूर्वी विराटची शतकांची सेंच्युरी कठीण!

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन!

‘पठाण’ आणि ‘ॲनिमल’ला मागे टाकले

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘रामायण पार्ट १’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या ५७ कोटी रुपये आणि ‘ॲनिमल’च्या ६३ कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकले आहे. मात्र, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या ७५ कोटी रुपयांच्या आणि रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’च्या १०२ कोटी रुपयांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडण्यात चित्रपटाला अपयश आले आहे. तसेच प्रभासच्या प्रमुख भूमिकेतील आणि मोठ्या प्रमाणावर टीका झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही ‘रामायण’ला मागे टाकता आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version