मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. सोमवार ९ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. या संदर्भात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे, या पत्रिपत्रकानुसार सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालय बंद असणार आहेत.
हे ही वाचा:
‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका
नेतान्याहूंचा पत्ता कट ? आयझेनकोट शपथविधीच्या तयारीत
‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी
रंजीव पुरी बनले मिशिगन हाऊसचे पहिले भारतीय-अमेरिकी अध्यक्ष
७ आणि ८ मार्चला सुट्टी आहेच. त्यात १० आणि ११ तारखेला अनुक्रमे पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे ९ तारखेलाही सुट्टी मिळाली तर सलग पाच दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळेल. त्यासाठीच ही मागणी करण्यात आली.
