घरराजकारणपवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेवरून विजय वडेट्टीवारांचा घणाघात

राजकारणात विचारधारेपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षच सत्तेसाठी बनला असून सत्तेशिवाय जगणं त्यांना मान्य नाही,’ अशा शब्दांत विअज्य वडेट्टीवार यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचना (डिलिमिटेशन) विधेयकाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारांवर घालवले. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करावी, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांच्या पक्षाची भूमिका पाहता विचारधारेपेक्षा सत्तेलाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही ठोस विचारधारा मान्य नसून सत्तेशिवाय राहणे त्यांना मान्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यसभेच्या पाठिंब्याचीही करून दिली आठवण

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी शरद पवार यांच्या राज्यसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. पवार यांना वयाच्या ८५व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जिवंत राहावेत, ही आमची भूमिका होती. मात्र, आता त्याच विचारांना संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. लोकशाही संपवण्याच्या प्रक्रियेत पवारांचे नाव येऊ नये, अशी आमची इच्छा होती. मात्र, दुर्दैवाने तसे होताना दिसत असल्याचेही ते म्हणाले.

हे ही वाचा : 

जैश संबंधित संशयिताला दिल्लीतून अटक

इटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!

बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचना विधेयकावरून विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्षाचा डिलिमिटेशन प्रक्रियेला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. मात्र, या भूमिकेवरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी इंडी आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करायला हवी होती, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version