घरविशेषबिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

गोव्यानंतर पश्चिम बंगालमध्येही कारवाई

बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत ओळखल्या जाणाऱ्या बिसलेरी कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. पश्चिम बंगालमधील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, गोव्यातील उत्पादन प्रकल्पातील पाण्याच्या नमुन्यातही त्रुटी आढळल्यानंतर कंपनीविरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे बिसलेरीवर ही दुसरी कारवाई ठरली आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील तेलीपारा गावात असलेल्या बिसलेरीच्या उत्पादन प्रकल्पातून पाण्याचा नमुना घेण्यात आला होता. प्रयोगशाळेतील तपासणीत त्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले. कोलिफॉर्म बॅक्टेरियाची उपस्थिती पाणी दूषित असण्याची शक्यता दर्शवते. सांडपाण्याची गळती किंवा दूषित पाइपलाइनमुळे असे जीवाणू पाण्यात प्रवेश करू शकतात. या प्रकरणी एफएसएसएआयने १२ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पीबी २०१’ या विशिष्ट बॅचच्या पाण्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. आता कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

गोव्यातील प्रकरणातही पाणी असुरक्षित

यापूर्वी गोव्यातील बिसलेरीच्या उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या नमुन्यात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळले होते. त्यामुळे नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला. कंपनीने या निष्कर्षांना आव्हान दिल्यानंतर नमुना संदर्भ प्रयोगशाळेत तपासण्यात आला. तेथेही पॉलिन्यूक्लियर एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) आढळल्याने कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, बिसलेरीने आपले पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर पिण्यास सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. उत्पादन प्रक्रियेत दहा टप्प्यांमध्ये ९० हून अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version