घरराजकारणशरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

विश्रांती घेण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने २ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून शरद पवार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, सध्या कामाचा ताण न घेता पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी या संवादाची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना प्रवास टाळण्यास आणि आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. ‘साहेब, तुम्ही पूर्ण विश्रांती घ्या. सुप्रिया आता तयार आहे. सुप्रिया आणि आम्ही देशाची काळजी घेऊ, तुम्ही फक्त तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या,’ अशा शब्दांत मोदी यांनी त्यांना आश्वस्त केल्याचे मणियार यांनी सांगितले. यावर शरद पवार यांनीही पंतप्रधानांचे आभार मानत आपण विश्रांती घेत असल्याचे सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोदी यांनी केलेल्या या विचारपुशीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
हे ही वाचा:
विराटच्या पसंतीची खेळी ठरली ४३ धावांची!

ट्रम्प यांच्या पराभवामुळे इराणमध्ये जल्लोष!

सोनं ४,८०० रुपयांनी महाग, चांदी १.९३ लाखांवर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ६४६ कोटींची घट

दरम्यान, पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईला रवाना झाले. मात्र, पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version