घरदेश दुनियाइराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव!

इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव!

जेडी व्हान्स यांची मध्यावधी निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या खराब कामगिरीसाठी इराण युद्धाला जबाबदार धरले. मात्र, व्हान्स यांनी लष्करी आक्रमण सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर ट्रम्प यांनी या युद्धाचे समर्थन करत, आपण हे पुन्हा करू असे म्हटले. २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांना मतदान करणाऱ्या अनेक मतदारांनी यंदा डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केले. युद्ध, महागाई आणि ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणापासून फारकत घेतल्यामुळे मतदार नाराज असल्याचे निवडणूक विश्लेषणातून समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या डेटा विश्लेषकांना मतदानाचा प्रतिसाद समाधानकारक दिसत होता. काही राज्यांमध्ये मतदान चांगले झाले, तर काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला. फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन मतदारांचे प्रमाण डेमोक्रॅटिक मतदारांपेक्षा नऊ टक्क्यांनी अधिक होते. त्यामुळे पराभवाचे कारण कमी मतदान नसून मतदारांचा बदललेला कल असल्याचे विश्लेषण करण्यात आले.

हे ही वाचा:

अमेरिकेचे नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल एल-सैयद यांचे कर्नाटकशी खास नाते

दिल्लीत बांधकामाधीन इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

इंडी आघाडीच्या रॅलीचा व्यापाराला फटका; देशव्यापी ‘धिक्कार दिन’ पाळणार

इराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध

एका सर्वेक्षणकर्त्याने पक्षापासून दूर गेलेल्या मतदारांना पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडे वळवण्यासाठी काय करावे लागेल, असा प्रश्न विचारला होता. त्यातून चार प्रमुख मुद्दे समोर आले. इराण युद्ध संपवणे, महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर लक्ष केंद्रित करणे, ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला प्राधान्य देणे आणि इस्रायलसोबतच्या संबंधांचा पुनर्विचार करणे, या मतदारांच्या प्रमुख अपेक्षा आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आर्थिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात पक्ष कमी पडल्याची कबुलीही देण्यात आली. मात्र, पराभवाचे मुख्य कारण युद्ध असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. स्थलांतरितांना सरसकट माफी देणे हा पराभवावरील उपाय नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाने पराभवाची कारणे प्रामाणिकपणे स्वीकारून भविष्यातील रणनीती ठरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version