घरराजकारणजरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर?

जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर?

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सातारा जिल्हा बँकेने ९६ कोटींचे कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिले होते. सध्या सातारा जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याला पुणे जिल्हा बँकेसोबत चार बँकांनी कर्ज दिले होते. या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग आहे. त्यामुळं जिल्हा बॅंकेला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीने बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी टाच आणल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडीच्या दाव्यानुसार, गुरु कमॉडिटीजने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत. तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं होतं.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

शेतकरी आंदोलकांचा पुन्हा राडा

लसीकरणाच्या गोंधळात अजून वाढ

निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version