घरराजकारणरिंकू शर्मा हत्येवरून कंगना राणावतचा केजरीवालांवर निशाणा, म्हणाली...

रिंकू शर्मा हत्येवरून कंगना राणावतचा केजरीवालांवर निशाणा, म्हणाली…

- Advertisement -

आपल्या जहाल ट्विट्स आणि रोखठोक भूमिकेमुळे सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. पण तिच्यासोबतच काँग्रेसच्या बड्या नेत्यानेही केजरीवालांना लक्ष्य केले आहे. याला कारण ठरले आहे दिल्लीतील रिंकू शर्मा हत्या प्रकरण. या प्रकरणाच्या अनुषंगाने कंगना आणि काँग्रेस नेत्याने अरविंद केजरीवाल यांचे जुने ट्विट शेअर करत त्यांना सवाल केला आहे.

दिल्लीत रामभक्त रिंकू शर्मा याची घरात घुसून हत्या करण्यात आली आणि या हत्येने सारा देश हादरला. या हत्येवरून सोशल मीडियावरचे वातावरण चांगलेच तापले असून आता याच विषयावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. २०१५ साली अखलाक याच्या मृत्यूनंतर केजरीवाल त्याच्या कुटुंबीयांची भेट द्यायला गेले होते. याचीच आठवण कंगनाने केजरीवालांना करून दिली आहे आणि ट्विट करत तुम्ही आता रिंकू शर्माच्या कुटुंबियांनाही भेटायला जाल अशी अपेक्षा असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

हे ही पहा:

रिंकू शर्मा हत्त्येप्रकरणी बॉलीवूडमधील ‘गॅंग’ गप्प का?

कंगना राणावत सोबतच काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही केजरीवालांना लक्ष्य केले आहे. त्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. रिंकू शर्माच्या कुटुंबियांना भेटण्याचा केजरीवाल यांचा काही इरादा आहे का असा सवाल सिंघवी यांनी विचारला आहे.

हे ही पहा:

रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version