घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदेश बदलणारी मोदींची ‘घाऊक’ नीती!

देश बदलणारी मोदींची ‘घाऊक’ नीती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या २५ वर्षांच्या कामावर नजर टाकली तर लक्षात येईल की, त्यांना भव्यतेचे आणि कोणतीही गोष्ट मास स्केलवर अर्थात घाऊक प्रमाणात करण्याचे व्यसन आहे. त्यामुळेच जे करायला अनेक देशांना दशके लागली, ते काम मोदींनी काही वर्षांत हातावेगळे केले. आज त्यांनी भारताची सेमीकंडक्टर इंडस्ट्री अशा पातळीवर नेऊन ठेवली आहे की, संरक्षण किंवा अंतराळ विज्ञानासारख्या संवेदनशील क्षेत्रासाठी लागणाऱ्या चिपची निर्मिती भारतातच होत आहे. उपग्रह, रडार किंवा क्षेपणास्त्रांच्या हृदयाची अर्थात तिथे लागणाऱ्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती आपण भारतातच करत आहोत. १९८९ मध्ये आगीच्या भक्षस्थानी पडलेली मोहालीतील सेमीकंडक्टर लॅबोरेटरी यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. एप्रिल २०२२ मध्ये याची सुरुवात झाली. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी, मोदींच्या वाढदिवशी या परिषदेचे आयोजन हा एक सुंदर योगायोग आहे. यूपीए सरकारच्या काळात किंवा त्याआधी जे घडले नाही, झाले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात कसे घडले, या प्रश्नाचे उत्तर साधेसोपे आहे. ज्या देशात २०१४ पूर्वी सेमीकंडक्टर चिपचे नाममात्र उत्पादन व्हायचे, तो देश आज सेमीकंडक्टर चिपच्या निर्यातीच्या तयारीत आहे; कारण दृष्टिकोन बदललेला आहे. आपण संरक्षण आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रासाठी आवश्यक चिप्स बनवत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होणार नाही, याचे भान मोदी सरकारला होते. विकसित देशांकडून आपली नाडवणूक होऊ शकते, आपल्याला वाकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याची जाणीव होती. हात पसरणे हे लाजिरवाणे असते, याचे मोदींना भान होते. त्यामुळे मोदींनी जे काम करायला किमान २५ वर्षे लागली असती, ते काम अवघ्या दहा वर्षांत करून दाखवले. तेही त्यांच्या खास शैलीत घाऊक प्रमाणात! आज आपण क्षेपणास्त्रांची घाऊक निर्मिती करू शकतो, निर्यातीचा विचार करू शकतो; कारण आपल्याकडे या क्षेपणास्त्रांचे हृदय आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version