घरराजकारणशिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका व्हिडीओने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय.

एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही तुटून पडले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषाही केली.

या संपूर्ण प्रकारावर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही ट्विट केले आहे. “सध्या तरी शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधलेली असल्याचे चित्र आहे.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

एका प्रकरणावर बोलताना संजय जाधवांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत किती राग आहे, याची झलक त्यांनी आपल्या भाषणातून दाखवली.

हे ही वाचा:

…जशी याच्या बापाची जहागिर होती

फडणवीस-शहा भेटीत काय होणार?

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा

एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली… कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…. एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं…. जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे, असा एकेरी हल्ला करत त्यांनी भुजबळांचा बाप काढला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version