घरराजकारणकाँग्रेसने जुनी मानसिकता बदलून विधेयकाला पाठिंबा द्यावा!

काँग्रेसने जुनी मानसिकता बदलून विधेयकाला पाठिंबा द्यावा!

किरेन रिजिजू यांचे आवाहन

महिला आरक्षण हा राजकीय विषय नसून राष्ट्रीय विषय आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली जुनी भूमिका बदलून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केले. डिलिमिटेशन विधेयकाबाबतच्या सर्व शंका आणि संभ्रम दूर झाले असून, कोणत्याही राज्याला किंवा व्यक्तीला चिंता करण्याचे कारण नाही, असा दावाही त्यांनी केला.

किरेन रिजिजू म्हणाले, “डिलिमिटेशन विधेयक, लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणे तसेच देशातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणे या सर्व बाबी आता पूर्णपणे स्पष्ट झाल्या आहेत. सरकारने प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना पूर्ण ३३ टक्के आरक्षण देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर काँग्रेसनेही आपली जुनी भूमिका आणि मानसिकता बदलावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“या विधेयकाला जो कोणी विरोध करेल, त्याला देशातील जनता माफ करणार नाही. प्रत्येक राज्य आणि समाजघटकाचा विचार करून लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे,” असे रिजिजू म्हणाले. काँग्रेसला विशेष आवाहन करताना त्यांनी, “आपल्या माथ्यावर काळा डाग लावून घेऊ नका आणि या विधेयकाला पाठिंबा द्या,” असे म्हटले.

हे ही वाचा : 

अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट

चीनच्या साथीने पाकिस्तानची अंतराळ सज्जता भारतासाठी धोक्याची घंटा!

डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी ‘एक्स’वर पोस्ट करत महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी महिला आरक्षणाबाबतचा जुना व्हिडिओही शेअर केला. “महिला शक्तीला सहभाग मिळवून देण्याची लढाई अनेक दशकांपासून सुरू आहे. महिला आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्याचा आमचा निर्धार आहे,” असे मोदी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version