घरविशेष१९८० मध्ये भारतीय नागरिकत्व नसतानाही सोनियांचे नाव मतदार यादीत!

१९८० मध्ये भारतीय नागरिकत्व नसतानाही सोनियांचे नाव मतदार यादीत!

दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे १९८० मध्ये त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दिली. नागरिकत्व मिळण्यापूर्वी मतदार यादीत नाव कसे नोंदवले गेले, असा प्रश्न उपस्थित करत दाखल झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही माहिती सादर केली.

या प्रकरणी राऊस ऍव्हेन्यू न्यायालयाने आयपी इस्टेट पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरकडून (एसएचओ) कारवाईचा अहवाल (एटीआर) मागवला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. सोनिया गांधी यांना एप्रिल १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. या संदर्भातील माहितीची जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पडताळणी करण्यात आल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

सोनिया गांधी यांचे नाव १९८० च्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्या भारतीय नागरिक नव्हत्या, असा दावा तक्रारदाराने केला आहे. भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर झाला असण्याची शक्यताही तक्रारदाराने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

‘बाहुबली २’चा विक्रम मोडला! ‘रामायण’ जगभरातील कमाईत तिसऱ्या स्थानी

अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट

चीनच्या साथीने पाकिस्तानची अंतराळ सज्जता भारतासाठी धोक्याची घंटा!

डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे अधिक वेळ मागितला. न्यायालयाने पोलिसांना मुदतवाढ दिली असून, तुघलक रोड पोलीस ठाण्याच्या एसएचओंना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version