घरबिजनेसगायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती

गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती

- Advertisement -

शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी कापड क्षेत्रात एक नवी क्रांती घडली आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेने अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती केली आहे. जयपूर येथील कुमारअप्पा खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अखत्यारीत ही संस्था येते. गायीच्या शेणापासून या कापडाची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या विशेष कापडाचे उद्घाटन केले आहे.

या अँटी बॅक्टेरियल वस्त्रावर जीवाणूची वाढ रोखली जाते. रुग्णालयांमध्ये तसेच इतर प्रकारच्या वैद्यकीय वापरासाठी हे कापड उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. तर कुमारअप्पा खादी ग्रामोद्योग महामंडळामार्फत गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक खादी प्राकृतिक रंगाचे उत्पादन केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

या उत्पादनांत ग्रामीण रोजगार निर्माण करण्याची भरपूर क्षमता आहे. तर यामुळे पर्यावरण संरक्षण होण्यास हातभार लागेल असे देखील राणे यांनी सांगितले. देशातील प्रत्येक गावात या प्रकारच्या रंग उत्पादन प्रकल्प उभारता यावा म्हणून त्यांच्या मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. असा प्रकल्प शाश्वत रोजगाराचे उदाहरण म्हणून दाखवता येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version