घरराजकारणमतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!

मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!

नाशिकमधील टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला लपवणारा एमआय़एमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आल्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरात एक छोटी सभा घेऊन त्याचा निषेध केला आणि मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ असे वचन दिले.

मतीन पटेल याचे छत्रपती संभाजीनगरमधील बेकायदा घर पालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने पाडले. त्यानंतर इम्तियाज जलील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पालिकेवर टीका केली. ते म्हणाले की, अनेक नगरसेवकांची अशी बेकायदा बांधकामे आहेत, त्याचे कागद आपल्याकडे आहेत, पण ती बांधकामे पाडली जात नाहीत फक्त मतीन पटेलचेच घर कसे काय पाडले गेले.

जलील म्हणाले की, या देशात आज जे सुरू आहे. या राज्यात जे सुरू आहे. त्याचा आम्ही सुरुवातीपासून निषेध करत आहेत. एखाद्या व्यक्तीवर आरोप होतो आणि काही संघटना, पक्षाचे नेते त्यांना दोषी ठरवतात. महापालिकेला प्रश्न विचारायला हवा की या शहरात केवळ एकच घर आहे का, जे अवैध आहे. बेकायदेशीर आहे. जर ते बेकायदेशीर असेल तर त्याबद्दल दुमत नाही. पण तुमच्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी अशा ज्या कारवाई करण्यात येत आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याप्रमाणे मतीन पटेल यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे १५ दिवसांची मुदत मागितली होती. कोणतेही घर पाडण्याअगोदर १५ दिवसांची नोटीस द्या अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. सुनावणी होऊन २४  तासही उलटले नाहीत. काय इतकी घाई होती घर पाडण्याची? भल्या पहाटे ४ वाजता पोलीस, अधिकारी यांना नारेगावमध्ये पाचारण करण्यात आले. सकाळी ६ वाजता हे घर पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता का? हे घर राष्ट्रासाठी धोकादायक होतं का?” असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला.

हे ही वाचा:

बीएफआयच्या नव्या निवड नियमांवर बॉक्सर मनोज कुमार यांचे प्रश्नचिन्ह

निदा खानला लपण्यास मदत करणाऱ्या नगरसेवक मतीनचे घर जमीनदोस्त

मुलायमसिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन

कांदिवली पूर्वमधील नाट्यगृहाचा मार्ग झाला मोकळा

आम्ही अलिशान घर बांधून देऊ

मतीन यांच्या घरावर दुपारी १२  वाजता महापालिकेने नोटीस चिकटवली आणि २४ तासांच्या आत कारवाई केली. मी नारेगावला गेलो. त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांच्या परिसरातील लोकांना भेटलो. मी सर्वांना एकच गोष्ट सांगितली की मतीनवर अजून आरोप सिद्ध झालेले नाही. राजकीय पक्षाचे नेते आरोप सिद्ध करणार नाहीत. संघटना आणि मीडिया असे मिळून एका व्यक्तीवर आरोप करतात, त्याला दोषी ठरवतात, हे दुर्दैवी आहे. यामध्ये मतीनच्या आई-वडिलांची, त्याच्या पत्नी आणि मुलाची काय चूक आहे, असा सवाल जलील यांनी विचारला. ज्या माणसाचं घर तुम्ही पडलय,, त्याला आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेलं नाही. आम्ही त्याचं घर पुन्हा अलिशान बांधून देणार. प्रत्यकेाकडून लोकवर्गणी जमा करणार. आम्ही आमचे योगदान देणार.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version