घरराजकारण'बांगलादेशात जे घडले तेच मुंबईत घडणार आहे...'

‘बांगलादेशात जे घडले तेच मुंबईत घडणार आहे…’

सध्या बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हिंदू मंदिरांची तोडफोडदेखील केली जात आहे. मुंबईतील मालाडच्या मालवणी विभागात काही अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबांचा छळ करून घरे सोडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याच्या आरोपावरून मुंबईचे भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी भाजप त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. त्यावरूनच नितेश राणे यांनी ट्विट करत मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी आपण आहोत, असे राणे यांनी जाहीर केले आहे.

‘जे बांगलादेशात घडले तेच पुढे मुंबईत घडणार आहे. त्यातील मालवणी हा सध्याचा पहिला भाग आहे अशा प्रकारे मुंबईत अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देणार आहोत, तेथील हिंदूंना पाठिंबा देणार आहोत. येत्या आठवड्यात आम्ही हे काम सुरू करणार आहोत. बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम उघडकीस आणणार आहोत.’ असे नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आमदार नितेश राणे यांनी काल (१८ ऑक्टोबर) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुंबई- मालवणी धर्तीवर स्थानिक प्रशासनाने स्वीकारलेल्या मवाळ पद्धतीबद्दल तक्रार केली. त्यापूर्वी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची तोफ डागली होती आणि आता नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version