घरव्हिडीओ गॅलरीबापट बहू बडबडला!

बापट बहू बडबडला!

या व्हिडिओमध्ये विद्यानंद बापट यांच्या डीजे, ध्वनीप्रदूषण, ढोल-ताशा आणि गणेशोत्सवाबाबतच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सुरुवातीला डीजे आणि कर्कश आवाजाविरोधातील त्यांच्या भूमिकेला मिळालेला जनतेचा पाठिंबा, त्यानंतर गणेशोत्सव, पारंपरिक ढोल-ताशा आणि मानाच्या गणपतींबाबत त्यांनी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद यावर या व्हिडिओमध्ये भाष्य केले आहे. हिंदू सण-उत्सव, परंपरा, श्रद्धा आणि ध्वनीप्रदूषण याबाबत समाजात सुरू असलेल्या चर्चेचा विविध अंगांनी आढावा घेत, बापट यांच्या भूमिकेतील विरोधाभासांवर या व्हिडिओत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासारख्या समस्या असतील तर त्या नियमांच्या चौकटीत सोडवाव्यात; मात्र त्याचवेळी परंपरा आणि उत्सवांचे स्वरूप जपले पाहिजे, अशी या व्हिडिओची भूमिका आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version