घरराजकारणनरेंद्र मोदी, भाजपला विरोध करताना राहुल गांधी बनलेत भारतविरोधी!

नरेंद्र मोदी, भाजपला विरोध करताना राहुल गांधी बनलेत भारतविरोधी!

अमित शाह यांनी राहुल गांधींसह कॉंग्रेसवर साधला निशाणा

“राहुल गांधींना सांगू इच्छितो की, नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध करता करता तुम्ही भारताला विरोध करायला सुरुवात केली आहे,” अशी घाणाघाती टीका देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसच्या युवा शाखेच्या सदस्यांनी ‘शर्टलेस’ निषेध केला होता. यावरून अमित शाह यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे. गुवाहाटी येथील जाहीर सभेला संबोधित करताना, अमित शाह यांनी विरोधकांना निषेध करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले परंतु, एआय शिखर परिषदेत निषेध केल्याबद्दल त्यांच्यावर टीकेची तोफ डागली.

अमित शाह म्हणाले की, “काँग्रेसने एआय समिटमध्ये कपडे काढून (शर्टलेस निषेध) देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्व राजकारणात आहोत. विरोधातही आहोत, पण त्यासाठी एक जागा आहे. तुम्ही शिखर परिषदेला राजकारणाचे व्यासपीठ बनवले, जिथे संपूर्ण जग भारत पाहण्यासाठी आणि भारतात गुंतवणूक करण्यासाठी एकत्र आले होते,” असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

“मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात असताना तुम्ही आता भारताला विरोध करायला सुरुवात केली आहे. माफी मागण्याऐवजी, राहुल गांधी म्हणाले की अर्धनग्न निषेध करणारे काँग्रेस कार्यकर्ते धाडसी आहेत. मला वाटत नाही की कोणताही जबाबदार राजकीय पक्ष असे करेल,” अशी टीका करत अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

अमित शहा यांनी काँग्रेसला भाजपला ‘सर्व शक्तीनिशी’ विरोध करण्याचे आव्हान दिले, परंतु जागतिक व्यासपीठावर अशा पद्धतीने प्रदर्शन करून भारतीय तरुणांच्या शक्यता मर्यादित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी जगासमोर भारत आणि त्याच्या लोकशाहीची बदनामी करत आहेत. आमचा विरोध करू शकता, सर्व शक्तीनिशी आमचा विरोध करू शकता, पण तुम्ही संसदेत पळून जाता. जिथे संपूर्ण जग भारताची युवा शक्ती पाहण्यासाठी येते, तिथे तुम्ही त्यांच्या शक्यता कमी करत आहात. भारताची जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असे अमित शाह म्हणाले.

हे ही वाचा: 

नागपुरमध्ये भारतातील सर्वात मोठा सोलर इन्गॉट- वेफर प्रकल्प

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत करणार १ लाख कोटींची गुंतवणूक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १ लाखांची फसवणूक

उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

दरम्यान, आसाम दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी गुवाहाटी येथे नव्याने बांधलेल्या प्रागज्योतिषपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यांनी गोलाघाट आणि तिनसुकिया कर्करोग केंद्रांचे उद्घाटन देखील केले. याव्यतिरिक्त, त्यांनी दिफू, जोरहाट आणि बारपेटा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्समधील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची व्हर्चुअल पद्धतीने पायाभरणी केली. त्यांनी गुवाहाटीमधील सिक्समाईल येथील स्वास्थ्य भवन आणि अभयपुरी जिल्हा हॉस्पिटलची पायाभरणी देखील केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version