घरस्पोर्ट्सपाकिस्तानला ३-० ने लोळवत भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक!

पाकिस्तानला ३-० ने लोळवत भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक!

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पाकिस्तानचा ३-० असा एकतर्फी पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुतीर्था मुखर्जी, सिंड्रेला दास आणि श्रीजा अकुला या भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदवला.

भारतीय संघाकडून सुतीर्था मुखर्जीने पहिल्या सामन्यात आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या अलीनाचा ११-३, ११-३, ११-४ असा पराभव केला. सुतीर्थाने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर सिंड्रेला दासने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या कुलसूम खानविरुद्ध प्रभावी खेळ केला. सिंड्रेलाने ११-६, ११-७, ११-५ असा विजय मिळवत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली.

तिसऱ्या सामन्यात श्रीजा अकुलाने फातिमा खानचा ११-४, ११-४, ११-५ असा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय महिला टेबल टेनिस संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

दरम्यान, एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारताने दोन रौप्यपदके जिंकली होती. १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने, तर वैयक्तिक स्पर्धेत इलावेनिल वलारिवानने रौप्यपदक पटकावले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version