घरस्पोर्ट्सईशानच्या त्रिशतकाने ईस्ट झोनने उभारला धावांचा डोंगर!

ईशानच्या त्रिशतकाने ईस्ट झोनने उभारला धावांचा डोंगर!

- Advertisement -

दुलीप ट्रॉफी २०२६च्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनने दक्षिण झोनविरुद्ध पहिल्या डावात तब्बल ७०८ धावांचा डोंगर उभा केला. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने २७० धावांची वादळी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र, त्याचे त्रिशतक अवघ्या ३० धावांनी हुकले.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या ईस्ट झोनला सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. वैभवने ३७ चेंडूंत ४४ धावा केल्या. त्यानंतर ईश्वरनने ७२ धावांची खेळी साकारली.

संघाची धावसंख्या १४७ वर असताना तिसरा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र ईशान किशनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. ईशानने शिखर मोहनसोबत चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. शिखरने ८५ धावा करत कर्णधाराला चांगली साथ दिली.

यानंतर ईशान आणि कुमार कुशाग्र यांनी दक्षिण झोनच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल २३० धावांची भागीदारी रचली. कुशाग्रनेही शानदार शतक झळकावत १०१ धावा केल्या.

ईशानने पुढे अनुकूल रॉयसोबत १४० धावांची भागीदारी करत ईस्ट झोनला ६०० धावांचा टप्पा पार करून दिला. ईशान सुरुवातीला २५० धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यावेळी त्याने ३०१ चेंडूंत २७ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते.

मात्र संघाला आणखी धावांची गरज असताना ईशान पुन्हा मैदानात उतरला. त्याने अखेर ३३४ चेंडूंत ३० चौकार आणि ७ षटकारांसह २७० धावांची अफलातून खेळी पूर्ण केली. त्यामुळे ईस्ट झोनने पहिल्या डावात १६३ षटकांत ७०८ धावा केल्या.

दक्षिण झोनकडून त्रिपुरण विजय सर्वाधिक प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने ४२ षटकांत १८० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. चामा मिलिंद आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या, तर शेख रशीदला १ विकेट मिळाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version