घरस्पोर्ट्सहर्ष राऊतला रिले शर्यतीत कांस्य पदक

हर्ष राऊतला रिले शर्यतीत कांस्य पदक

२४ ते २८ जून २०२६ या कालावधीत भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत हर्ष राऊतने ४ x १०० मीटर रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे.

हर्षने शर्यतीची छान सुरुवात केली आणि पदक जिंकण्याची मोठी संधी निर्माण केली. हर्ष १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या पहिल्या आशियाई ‘अंडर-२३’ ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हर्षसोबत या रिलेमध्ये ऋषिप्रसाद देसाई (संभाजीनगर), लौकिक मेळगे (पुणे), सौरभ नैताम (अकोला) हे खेळाडू होते. निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष सराव करतो आहे.

हे ही वाचा:

गिरगाव सेक्स रॅकेटमधून मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका

“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा

बांगलादेशचा पायावर धोंडा भारताला ऑफर देण्याची सूचना होती, दिली चीनला…

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आरक्षणातील मुस्लिमांची घुसखोरी संपली !

अशा मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारा तो ठाणे जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. हर्षने यापूर्वी ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिप’ आणि ‘आशियाई ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिप’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

मीनल पालांडे (अतिरिक्त उपायुक्त, टीएमसी) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख, टीएमसीएपीवाय) यांनी हर्षचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले असून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. – निलेश पाटकर, प्रशिक्षक.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version