घरस्पोर्ट्सरोहितच्या बॅटला निवृत्तीचे फतवे मान्य नाहीत!

रोहितच्या बॅटला निवृत्तीचे फतवे मान्य नाहीत!

भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्यावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत दोघांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. “रोहितला आता कुणालाच काही सिद्ध करायचं नाही. त्याला विश्वचषक खेळायचा असेल, तर तो नक्की खेळेल,” असे अश्विनने स्पष्टपणे सांगितले.

लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात रोहित शर्माने खेळलेल्या १३८ धावांच्या दमदार खेळीनंतर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर ही प्रतिक्रिया दिली.

अश्विन म्हणाला, “रोहित आणि विराटला खेळायचं असेल, तर त्यांना कोणीही संघाबाहेर करू शकत नाही. त्यांच्या कामगिरीचा इतिहासच तसा आहे. रोहितने जवळपास १२,००० धावा केल्या आहेत. त्याला कुणालाच काही सिद्ध करण्याची गरज नाही. चाहते त्याला पाहण्यासाठी मैदानात येतात. त्याला वगळलं, तर मोठा गदारोळ होईल.”

रोहितच्या फलंदाजीचे कौतुक करताना अश्विन म्हणाला की, एकदा रोहित खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो पूर्ण नियंत्रणात दिसत होता. “जोश टंगच्या चेंडूवर पुल शॉट खेळल्यानंतर रोहित लयीत आला होता. थोडं अधिक नशीब आणि आत्मविश्वास लाभला असता, तर तो १८० धावाही करू शकला असता आणि भारताला विजय मिळवून देऊ शकला असता,” असे त्याने सांगितले.

अश्विनच्या मते, रोहितचा आता खेळण्यामागचा उद्देश टीकाकारांना उत्तर देणे किंवा स्वतःला सिद्ध करणे हा नसून, पुढील एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची त्याची स्वतःची इच्छा हेच त्यामागचे खरे कारण आहे.

तो पुढे म्हणाला, “आम्ही रोहितला इतकी वर्षे खेळताना पाहिले आहे. त्याला आता काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. हा फक्त त्याच्या मनातील इच्छेचा प्रश्न आहे. त्याला विश्वचषक खेळायचा असेल, तर तो नक्की खेळेल.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version