घरस्पोर्ट्सभारतीय मैदानावर गिलचीच हवा!

भारतीय मैदानावर गिलचीच हवा!

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने निरंजन शहा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची शानदार खेळी केली. या मालिकेतील भारतीय कर्णधार म्हणून गिलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले.

भारतीय भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध गिलचा खेळ अक्षरशः वादळी ठरत आहे. आतापर्यंत भारतात किवी संघाविरुद्ध खेळलेल्या ७ वनडे डावांत गिलने तब्बल ५७८ धावा केल्या असून त्याची सरासरी ११५.६ इतकी अफलातून आहे.

या सात डावांत गिलच्या खेळी पुढीलप्रमाणे आहेत :
२०८ (१४९ चेंडू), ४०* (५३), ११२ (७८), २६ (३१), ८०* (६६), ५६ (७१) आणि ५६ (५३).

या सामन्यात भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला असून संघात रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ मायकेल ब्रेसवेल यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. संघात डेव्होन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), झॅकरी फॉल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन आणि जेडन लेनॉक्स यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

भारत करणार ११४ राफेल विमानांसाठी ३.२५ लाख कोटी रुपयांचा करार

ईव्हीएमच्या बॅकअप मशिनवर राज ठाकरेंचा आरोप

“मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्या”

निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांना सुनावले!

या मालिकेतील पहिला सामना वडोदऱ्यात खेळवण्यात आला होता, जिथे भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सनी पराभव केला. त्या सामन्यात न्यूझीलंडकडून डेरिल मिचेल (८४), हेन्री निकोल्स (६२) आणि डेव्होन कॉनवे (५६) यांनी अर्धशतकी खेळी करत ८ बाद ३०० धावा उभारल्या होत्या.

भारताने ४९ षटकांत हे आव्हान पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने ९३, शुभमन गिलने ५६, तर श्रेयस अय्यरने ४९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version