घरबिजनेससंचार साथीमुळे ५ हजार कोटींपर्यंतच्या सायबर फसवणुकीपासून बचाव

संचार साथीमुळे ५ हजार कोटींपर्यंतच्या सायबर फसवणुकीपासून बचाव

पोर्टलला भेट देणाऱ्यांची संख्या ३० कोटींच्या पुढे

मे २०२३ मध्ये सुरू झाल्यापासून संचार साथी पोर्टलला भेट देणाऱ्यांची एकूण संख्या ३० कोटींच्या पुढे गेली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ५ हजार कोटी रुपयांहून अधिक संभाव्य सायबर फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत झाली आहे. दूरसंचार मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संचार साथीच्या माध्यमातून १४ लाखांहून अधिक हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल संच शोधून परत मिळवण्यात मदत झाली आहे. तसेच, नागरिकांच्या नावावर किती मोबाईल जोडण्या कार्यरत आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या ४ कोटींहून अधिक विनंत्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

दूरसंचार विभागाने विकसित केलेले हे पोर्टल प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला सोप्या आणि सहज वापरता येतील अशा विविध सुविधा उपलब्ध करून देते. या सुविधांच्या माध्यमातून नागरिक संशयास्पद दूरध्वनी किंवा संदेशांची तक्रार करू शकतात, आपल्या नावावर किती मोबाईल जोडण्या सुरू आहेत हे तपासू शकतात, हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल संच बंद करू शकतात तसेच नवीन मोबाईल संच खरेदी करण्यापूर्वी तो अस्सल आहे की बनावट, हे तपासू शकतात.

हे ही वाचा:

मेंदूतील चेतापेशींवर प्रकाशाच्या मदतीने नियंत्रणासाठी ‘नोबेल’

वनडेत चमकलेल्या आमिर जांगूला आता टी-२०त संधी

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री मान यांच्या सहाय्यकाची सीबीआय चौकशी

रशियात ‘प्लेग’ची भीती? लॅब संशोधकाच्या मृत्यूनंतर २०० जण क्वारंटाइन

मंत्रालयाने सांगितले की, संचार साथी पोर्टलला दिलेली प्रत्येक भेट नागरिकांच्या सुरक्षेला हातभार लावते, तर नागरिकांनी नोंदवलेला प्रत्येक संशयास्पद दूरध्वनी, संदेश किंवा अन्य संपर्क अनेक इतर नागरिकांचेही संरक्षण करण्यास मदत करतो.

संचार साथीवर नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून तिचे उपयुक्त माहितीमध्ये रूपांतर केले जाते. या माहितीच्या आधारे दूरसंचार विभाग, बँका आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पुढील बळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यास मदत होते. त्यामुळे संचार साथीचा वापर करणारा प्रत्येक नागरिक हा सायबर योद्धा आणि सायबर फसवणुकीविरोधातील सुरक्षा कवच म्हणून काम करत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version