घरस्पोर्ट्ससेमीफायनलचे रणांगण तापले; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे महाआव्हान!

सेमीफायनलचे रणांगण तापले; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे महाआव्हान!

महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील ग्रुप ‘ए’मधील सेमीफायनलची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. गुरुवारी भारताने बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालांमुळे दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे चार सामन्यांत ६ गुण झाले असून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा अखेरचा साखळी सामना रविवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे चारही सामने जिंकत ८ गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये थेट प्रवेश मिळवायचा असेल, तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल.

नेट रनरेटच्या बाबतीत भारत दक्षिण आफ्रिकेपेक्षा बऱ्याच पुढे आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवला तरी भारताला मागे टाकणे त्यांच्यासाठी कठीण आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आयर्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवणेही त्यांच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

बांगलादेशचेही सेमीफायनलचे गणित अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. मात्र त्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेचा १०० हून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. शिवाय भारताने ऑस्ट्रेलियाकडून किमान १३० धावांनी पराभूत होणेही आवश्यक आहे. सध्या बांगलादेशच्या खात्यात चार सामन्यांत ४ गुण आहेत.

ग्रुप ‘ए’मधील सेमीफायनलची शर्यत आता अखेरच्या सामन्यांवर येऊन ठेपली असून भारत-ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका-आयर्लंड या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. भारताने विजय मिळवला तर उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल; अन्यथा नेट रनरेट आणि इतर निकालांवर चित्र अवलंबून राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version