घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘जंतर मंतर’वर उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी काल भाजप नेते तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन मागे घेतले. अभिजीत दिपके याने मात्र आंदोलन जारी ठेवले. आज उसने देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. हे दोघेही ‘जंतर मंतर’च्या उपोषण मंचावर एकत्र होते; मात्र आता त्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. आपला 'अण्णा हजारे' होईल अशी भीती वांगचूक यांना होती काय? याची शक्यता दाट आहे. रातोरात वेगाने घडामोडी घडल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ११:५२ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर पुढच्या तासाभरात उपोषणनाट्य संपले. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी हे उपोषण मागे घेतले आहे, पहाटे १:२१ वाजता त्यांनी ‘एक्स’वर (X) ही पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ मेसेज अपलोड केल्यानंतर ठीक १ तास २९ मिनिटांनी हे घडले. देशात हिंसाचार पसरेल ही शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले, हेही लक्षात घेण्यासारखे आहे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version