घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकोण नाक रगडणार, ट्रम्प की चॅनेलवाले?

कोण नाक रगडणार, ट्रम्प की चॅनेलवाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा पंगा सुरू केलेला आहे. ते आता अमेरिकेतील बड्या मीडिया हाऊसला भिडलेले आहेत. ट्रम्प प्रशासनाने सीएनएन आणि एमएस नाऊ या टीव्ही वाहिन्यांसह पोलिटीको या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मला व्हाईट हाऊसमध्ये वार्तांकनासाठी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. स्वतःच्या अधिकृत कव्हरेजसाठी ट्रम्प यांनी ‘ट्रम्प टीव्ही’ची घोषणाही केली आहे. ट्रम्प ताणून धरतायत हे लक्षात आल्यानंतर काही मीडिया हाऊसने आता व्हाईट हाऊसच्या बातम्यांवर बहिष्कार घातला आहे. ट्रम्प यांना अशा हाणामारीचा शौक जडलेला आहे; मीडियाला मात्र ती त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय मीडियाने धडा घ्यावा, अशा या घडामोडी आहेत. ट्रम्प यांना प्रसिद्धीची भारी हौस आहे. ‘ट्रुथ सोशल’च्या माध्यमातून ते रोज वाहिन्यांना बातम्या पुरवत असतात. गेल्या काही काळात एकही बाब त्यांच्या मनासारखी होत नाही. व्हेनेझुएलावर केलेला कब्जा आणि ग्रीनलँडसोबत अलीकडे झालेला संरक्षण करार हे काही अपवाद आहेत. परंतु डळमळणारे अमेरिकी अर्थकारण, रेंगाळलेले इराण युद्ध, रशिया-युक्रेन युद्धात फसलेले मध्यस्थीचे प्रयत्न, आशियातील भारत, चीन, दक्षिण कोरिया या देशांशी ताणलेले संबंध, युरोपातील नेत्यांची नाराजी, आखातातील मित्रदेशांशी दुरावा अशी ट्रम्प यांच्या अपयशांची मालिका मोठी आहे. अमेरिकी माध्यमांत याबाबत सातत्याने बोलले जात आहे. अर्थातच ते ट्रम्प यांना आवडणारे नाही. न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्टसारख्या बड्या मीडिया हाऊसलासुद्धा ट्रम्प यांनी दम दिलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version