घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणविरोधकांना ऐकवेल मोटा भाईचा जवाब?

विरोधकांना ऐकवेल मोटा भाईचा जवाब?

गुमशुदा, लापता असल्याचा दावा करत विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शोधतायत. त्यांनी संसदेत यावे, २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईबाबत निवेदन करावे, अशी मागणी करतायत. हे निवेदन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. अमित शहा जवाब दो अशी मागणी करत, विरोधकांनी आज संसदेवर मोर्चा काढला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आणि सौरव दास यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरात सूर मिसळलेला आहे. अमित शहा शांत आहेत, याचा अर्थ ते शांत बसलेत असा अर्थ विरोधकांनी काढलेला दिसतो. शहा नेमके काय करतायत, हे ठामपणे सांगता येत नसले तरी त्याचा अंदाज बांधणे कठीण नाही. कॉकरोज जनता पार्टीच्या मोर्चात पॅलेट गनचा वापर झाला, विद्यार्थ्यांवर बळाचा प्रयोग झाला, हा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांच्या दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयही पॅलेट गन वापरू नका असे सांगत नसून पॅलट गन कोणत्या परिस्थितीत वापरावी याची मार्गदर्शक तत्वे निश्चित कऱण्यावर भर देते आहे. पॅलेट गनबाबत केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा खुलासा विरोधी पक्षातील नेत्यांना हवा आहे. अभिजीत दिपकेचे तर असे म्हणणे आहे, जंतर मंतरवर झालेल्या मोर्चात दाखलेबाज गुंड सहभागी होणे, हे अमित शहा यांचे अपयश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version