घरविशेषकॉलेजात घुसणाऱ्या 'कॉक्रोच' कार्यकर्त्याला ओळखपत्र विचारत शिक्षकांनी हाकलले

कॉलेजात घुसणाऱ्या ‘कॉक्रोच’ कार्यकर्त्याला ओळखपत्र विचारत शिक्षकांनी हाकलले

उत्तराखंडमधली घटना

- Advertisement -

कॉक्रोच जनता पार्टीच्या एका प्रतिनिधीला कॉलेजात जाण्यापासून रोखल्याची घटना उत्तराखंडमधील कालाढुंगी याठिकाणी घडली. तेथे असलेल्या अटल उत्कृष्ट कॉलेजमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एक प्रतिनिधी शिरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तेथील शिक्षकाने त्याला रोखले. या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे आंदोलन केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातील शाळांत जात तेथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जाऊन शाळांची पाहणी केल्यामुळे त्यावर टीका होऊ लागली. कॉक्रोज जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेने अशा सरकारी शाळांमध्ये शिरून शिक्षकांना दमदाटी करणे, तेथील व्यवस्थांचे फोटो, व्हीडिओ काढणे आणि समाजमाध्यमांत टाकणे सुरू केले. त्याला विरोधही होऊ लागला.

उत्तराखंडमधील कालाढुंगी येथील या महाविद्यालयात कॉक्रोच जनता पार्टीचा एक कार्यकर्ता शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला तेथील शिक्षकांनी रोखले. त्याच्याकडून ओळखपत्राची मागणी करण्यात आली, तेव्हा त्या कार्यकर्त्याने आपले ओळखपत्र देण्यास नकार दिला. उलट तो त्या शिक्षकांची वाद घालू लागला. तेव्हा शिक्षकांनी सांगितले की, शाळेत असे कुणी अतिरेकीही येईल. तेव्हा सदर कार्यकर्ता म्हणाला, बघा आता मला हे अतिरेकी म्हणत आहेत. कॉलेजमधील मुलांनाही साद घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्याने केला. मात्र शिक्षकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

हे ही वाचा:

जळगावात मुस्लिम मोहल्ल्यातून गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

जपानला धूळ चारत बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित!

राम मंदिरातून अनधिकृतपणे शंभरवेळा रक्कम काढली!

महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्याप्रमाणे नोएडातही कॉक्रोच पार्टीचा सौरव दास शाळेत शिरण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा स्थानिकांनी त्यांना जाब विचारण्यास प्रारंभ केला. असे शाळेत घुसून तुम्ही मुलांचे लक्ष विचलित करू नका, असे स्थानिकांनी सौरव दासला समजावले. त्याचाही व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

सरकारी शाळांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणतीही परवानगी न घेता शिरत असल्याबद्दल टीका होत आहे. शिवाय, ते त्या शाळेत जाऊन शिक्षकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल टीकाही झाली आहे. पंजाबमध्येही कॉक्रोच पार्टीचे कार्यकर्ते गेले होते पण तिथे मात्र त्यांचे वागणे अतिशय सभ्य, संयमी दिसत होते. तेथे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार असल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते शाळांमध्ये जाऊन केवळ माहिती घेत होते, मात्र अन्य शाळांमध्ये मात्र ते आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version