घरविशेषजम्मू-काश्मीरमधील दोडा येथे लष्करी गाडी दरीत कोसळून १० जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे लष्करी गाडी दरीत कोसळून १० जवानांचा मृत्यू

अपघतात सात जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोडा जिल्ह्यातील भदरवाह भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण १७ जवानांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन उंचीवरील एका चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर ही गाडी २०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात भदरवाह- चंबा आंतरराज्यीय रस्त्यालगत खन्नी टॉपवर झाला. सध्या लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त बचाव मोहीम सुरू आहे. मृतांची संख्या १० असल्याची माहिती आहे. जखमींपैकी काहींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना विशेष उपचारांसाठी विमानाने उधमपूर लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

चीनचा ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’त सहभागी होण्यास नकार!

शाळेच्या भिंतीवरची ‘ती’ ओळ आणि जम्मूची हंसजा बनली ‘रुद्र’ची पहिली महिला पायलट!

मुंबई महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

धार भोजशाळा: वसंत पंचमीला पूजा आणि नमाज दोन्ही होणार!

जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. “डोडा येथे झालेल्या दुःखद रस्ते अपघातात आपण भारतीय सैन्याच्या १० शूर सैनिकांना गमावले याबद्दल मला खूप दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझे मनापासून संवेदना. जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे आणि सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्देश देण्यात आले आहेत. या कठीण काळात राष्ट्र आपल्या सशस्त्र दलांसोबत आणि त्यांच्या कुटुंबांसोबत उभे आहे,” असे त्यांनी ट्विट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version