घरविशेषआयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची बेधडक मुलाखत; उद्या संध्याकाळी ६ वाजता!

आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची बेधडक मुलाखत; उद्या संध्याकाळी ६ वाजता!

न्यूज डंकाच्या युट्युब चॅनलवर महामुलाखत होणार प्रदर्शित

आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी आणि कर्तव्यतत्परतेसाठी नावाजेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकतीच ‘न्यूज डंका’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यूज डंकाने सुरू केलेल्या ‘महामुलाखत’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी समीर वानखेडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत समीर वानखेडे यांनी बेधडकपणे आपली भूमिका मांडत अनेक विषयांवर मतं मांडली.

समीर वानखेडे यांनी मुलाखतीत त्यांचा अधिकारी होण्याचा प्रवास उलगडला. वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणकोणत्या पदावर काम केले हे सांगत असताना तेव्हाचे निरनिराळे अनुभव त्यांनी कथन केले. ‘नशामुक्त भारत’ हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास कशाची भीती नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केले. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठीचा मंत्रही त्यांनी या मुलाखतीतून दिला.

समीर वानखेडे यांच्याशी केलेल्या या दिलखुलास गप्पा न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाहायला मिळणार आहेत. न्यूज डंकाच्या युट्युब चॅनलवर ही महामुलाखत सर्वांना पाहता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version