घरविशेषस्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अखेरचा निरोप

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अखेरचा निरोप

बीएमसी-पोलिसांकडून कडेकोट व्यवस्था

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) सायंकाळी ४ वाजता दादर पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका (बीएमसी) आणि मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची तयारी करण्यात आली असून, सामान्य नागरिक आणि व्हीआयपींसाठी वेगवेगळे प्रवेशमार्ग ठेवण्याची शक्यता आहे. जी-नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी अंत्यसंस्काराची माहिती अधिकृतपणे दिली.

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी लता मंगेशकर आणि रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी केलेल्या नियोजनाचा अनुभव लक्षात घेऊन यावेळीही तशीच प्रभावी तयारी करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. दरम्यान, लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी पार्थिव ठेवण्यात आले असता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. परिसरात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हे ही वाचा:

“युद्ध संपलेले नाही”; बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये नेतान्याहूंचा दक्षिण लेबनॉन दौरा

सौदी अरेबियात पाकिस्तानने १३,००० सैनिक आणि फायटर जेट्स पाठवले

नेतान्याहू यांचा एक फोन आणि अमेरिका- इराण चर्चा निष्फळ! नेमकं प्रकरण काय?

इराण-अमेरिका शांतता चर्चेचे अपयश; सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

असे असणार वाहतूक नियोजन:

  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर वाहतुकीवर निर्बंध असतील
  • लेडी जमशेदजी मार्गावर वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाईल
  • वाहतूक व पोलीस विभागाकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था
  • कोहिनूर प्लाझा येथे पार्किंग सुविधा
  • रस्त्यांवरील पार्किंगला बंदी; स्थानिक रहिवाशांना मर्यादित सवलत
  • मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून परिसरातील नागरी सेवा सुरळीत ठेवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version