घरविशेषचालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

चालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

जळगावमधील दुर्दैवी घटना

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर झाड कोसळलं. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर, चंद्रकांत शिंदे, निलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर

येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !

संबंधित घटना ही गुरुवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या होत्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version