घरविशेषकधी काळी थाटला होता संसार, आता बिग बॉसच्या घरात एकत्र

कधी काळी थाटला होता संसार, आता बिग बॉसच्या घरात एकत्र

बहुचर्चित लोकप्रिय असा रियलिटी शो बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे रविवार 19 सप्टेंबर रोजी या रियालिटी शो चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला असून विविध क्षेत्रातील १५ प्रसिद्ध लोक बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. यात अभिनेता, अभिनेत्री, गायक, सामाजिक कार्यकर्ते, किर्तनकार अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे हे सर्वजण आमच्या शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ एकत्र राहणार असून बिग बॉस सांगतील ते टास्क करणार आहेत

बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या १५ स्पर्धकांची यादी खालील प्रमाणे आहे.
अभिनेत्री सोनाली पाटील, अभिनेता विशाल निकम, गायक उत्कर्ष शिंदे, अभिनेता अविष्कार दारव्हेकर, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, अभिनेत्री स्नेहा वाघ, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेत्री गायत्री दातार, अभिनेता विकास पाटील, अभिनेता जय दुधाणे, गायक संतोष चौधरी उर्फ दादूस, अभिनेत्री मीनल शाह, अभिनेता अक्षय वाघमारे

यापैकी अभिनेता अविष्कार दारव्हेकर आणि अभिनेत्री स्नेहा वाघ हे पती-पत्नी राहिले आहेत. त्यांनी एकत्र संसार थाटला होता. पण काही वर्षातच ते एकमेकांपासून विभक्त झाले. अविष्कार आणि स्नेहा या दोघांनाही आपण बिग बॉसच्या घरात एकत्र असू याची सुतरामही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांचा भूतकाळ लक्षात घेता बिग बॉसच्या घरात आता त्यांचे भविष्य नेमके कसे असणार याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version