घरविशेषठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द

ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द

राज्यामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नियोजित करण्यात आली आहे. तरी मुंबईतील शाळांमध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व शाळांमध्ये अचानक उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केल्याने मोठा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा रद्द झाल्यामुळे पालक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत.

शिष्यवृत्ती परिक्षेसाठी पूर्ण तयारी केलेली असताना मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आता उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आतापर्यत ५ ते ६ वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, अखेर ही परीक्षा राज्यभर घेण्याचा घाटही घातला. परंतु केवळ मुंबईतील परीक्षा मात्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेबाबतचा विषय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसमोर ठेवण्यात येईल व या परीक्षेबाबत यथावकाश कळवण्यात येणार आहे.

मुंबईतून २४ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पाचवीचे विद्यार्थी १३ हजार २९८, तर आठवीचे विद्यार्थी ११ हजार १७४ इतके आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पालिकेच्या शाळांमधून ८ हजार ८२५ विद्यार्थी, तर शिक्षण विभागाच्या तिन्ही विभागांशी संलग्न शाळांमधील १५ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश

संजय राठोड करतो लैंगिक छळ…यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र

अबब! एकाच माणसाच्या शरीरात पाच किडनी!

राखी निर्बंधांच्या बंधनात; आता ऑनलाइनचा मार्ग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा आणि सुरक्षितेला प्राधान्य देत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सुरवातीला फक्त मुंबई महापालिका शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. इतर शाळेत परीक्षा नियोजन करावे की नाही? याबाबत शिक्षक, शाळा संभ्रमात होत्या. त्यानंतर आता मुंबईतील सर्व शाळांमध्ये उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकद्वारे कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version