घरविशेषमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व येथे रक्तदान शिबीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व येथे रक्तदान शिबीर

आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले शुभारंभ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार भातखळकर म्हणाले की, देवेंद्रजींच्या सक्षम आणि खंबीर नेतृत्वात महाराष्ट्र गतीने प्रगती करत आहे. त्यांच्या हातून असेच लोककल्याणाचे कार्य घडत राहो आणि आई जगदंबेच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थन केली.

सेवा आणि संघटन हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवणे अशी विविध कामे आपण भाजपाच्या माध्यमातून करत असतो असे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बोईंग विमानांच्या इंधन स्विचची तपासणी पूर्ण

भारतीय उच्चायोगाने बांगलादेश सरकारला पत्र

तमिळनाडूच्या चार मच्छिमारांना अटक

गिलगित-बाल्टिस्तानमध्ये पूराचा कहर

यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि आयोजकांचेही आमदार भातखळकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version