घरविशेष‘देव देश आणि धर्म’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

‘देव देश आणि धर्म’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

‘सकल हिंदू संमेलन’ निमित्ताने विशेष आयोजन

सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना अधोरेखित करणारे लेखक कपिल प्रदीप घोलप यांचे पहिले पुस्तक ‘देव देश आणि धर्म’ याचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी ऐतिहासिक महाड नगरीत उत्साहात पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्ववादी विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा प्रकाशन सोहळा ‘सकल हिंदू संमेलन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, श्री वीरश्वर वस्ती यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाड नगर परिषद शाळा क्रमांक २, आझाद मैदान येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात प्रकाशजी स्वामी यांचे आशीर्वचन होणार असून अॅड. श्रीराम ठोसर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रकाशजी टेंबे हे संघ परिचय, प्रणाली वनारसे या पंच परिवर्तन यावर सत्र घेतील. तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असणार आहे. भजन, लाठीकाठी प्रात्यक्षिक, पारंपारिक नृत्य, पोवाडा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कोलकाताचे माजी डीसीपी शंतनू सिन्हा बिस्वास यांना अटक

दिल्लीत बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; चालक, वाहकाला अटक

चांदीत विक्रमी तेजी; रॉबर्ट कियोसाकींचं भाकीत खरं ठरतंय का?

‘मिनाब १६८’ विमानाने इराणचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत; ‘मिनाब १६८’ काय आहे?

“माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,” असे आवाहन लेखक कपिल प्रदीप घोलप यांनी नागरिकांना केले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली असून महाड परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version