घरविशेषब्राम्होस झाले अधिक घातक

ब्राम्होस झाले अधिक घातक

भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्या ब्राम्होस क्षेपणास्त्राचा समावेश होऊ शकतो. हे ब्राम्होस क्षेपणास्त्र अधिक घटक असणार आहे. भारताने गुरुवार, १३ मे रोजी सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. विमानातून प्रक्षेपण नियोजित करण्यात आले होते आणि क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील निर्धारित लक्ष्यावर थेट मारा केला.

‘सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचे हे पहिले प्रक्षेपण होते.भारतीय हवाई दलाने सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानातून जमिनीवर आणि समुद्रावर खूप दूर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.

हे ही वाचा:

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी

भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड यांनी समर्पित आणि एकत्रित प्रयत्नांनी हे यश साध्य करण्यासाठीची देशाची क्षमता सिद्ध केली आहे. क्षेपणास्त्राची विस्तारित पल्ला क्षमता आणि सुखोई – ३० एमकेआय विमानाच्या उच्च कार्यक्षमतेमुळे भारतीय हवाई दलाला एक सामरिक पोहोच आणि भविष्यात युद्धक्षेत्रांवर वर्चस्व राखण्यासाठी क्षमता प्राप्त होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version