घरविशेषकॅनडा: खलिस्तानी संघटनेची धमकी; भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचा इशारा

कॅनडा: खलिस्तानी संघटनेची धमकी; भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचा इशारा

संघटनेच्या निवेदनात जस्टिन ट्रूडो यांचा विधानाचा उल्लेख 

बंदी घातलेली खलिस्तानी संघटना शिख्स फॉर जस्टिसने (एसएफजे) पुन्हा एकदा भारतविरोधी कारवाया जाहीर केल्या आहेत आणि १८ सप्टेंबर रोजी कॅनडातील व्हँकूवर येथील भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. संघटनेने एक निवेदन जारी करून दावा केला आहे की भारतीय वाणिज्य दूतावास खलिस्तानी समर्थकांना लक्ष करत आहे, म्हणूनच ही कारवाई करण्यात येणार आहे.

एसएफजेने म्हटले आहे की ते भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. संघटनेने आपल्या निवेदनात माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत दिलेल्या विधानाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

खरे तर, ब्रिटिश कोलंबियातील गुरु नानक शीख गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी निज्जरची गोळ्या घालून हत्या केली होती. भारताने तेव्हापासून ट्रूडोचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तथापि, एसएफजे म्हणते की ‘दोन वर्षांनंतरही भारतीय वाणिज्य दूतावास खालिस्तान रेफरेंडम समर्थकांवर लक्ष ठेवण्याचं आणि गुप्तहेरांचं जाळं (जासूसी नेटवर्क) चालवण्याचं काम करत आहे.’

हे ही वाचा : 

… म्हणून कर्कला मारले; आरोपी रॉबिन्सनने पार्टनरला काय सांगितले?

“५० वर्षे देशसेवा, २७ आंतरराष्ट्रीय पुरस्कार”

“राजकारणात मोदींची एन्ट्री: एक प्रेरणादायक प्रवास”

समर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?

दरम्यान, एसएफजेचे नेतृत्व गुरपतवंत सिंग पन्नून करत आहे, ज्याच्यावर भारतात आधीच बंदी घालण्यात आली आहे. भारताने कॅनडाच्या भूमीतून खलिस्तानी अतिरेकी भारतविरोधी कारवायांना चालना देत असल्याचा मुद्दा बराच काळ उपस्थित केला आहे, परंतु कॅनडाच्या सरकारने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version