घरविशेषपावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा

पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा

आमदार अतुल भातखळकर यांचे निर्देश, नालेसफाई कामाची केली पाहणी

कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २३, २४, २७ आणि २८ मधील पावसाळा पूर्व कामे तसेच नालेसफाई कामाची पाहणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे तातडीने पूर्ण करून कुठेही पाणी भरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

आमदार भातखळकर यांनी कांदिवली पूर्वमधील पोयसर नदी, स्व. प्रमोद नवलकर उद्यान, जनता नगर, हनुमान मंदिर, बिहारी टेकडी, गावदेवी नाला, डीव्हीएम स्कूल जवळील नाला, महिंद्रा यलो गेट नाला, लोखंडवाला ग्रीन मेडोज मागील नाला, वडारपाडा सुलतान तबेला बाजूचा नाला, क्रांती नगर नाला या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या सफाई कामाचा आढावा घेतला.

हेही वाचा..

‘तीन निवडणुकांत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या आम्हाला एकाच निवडणुकीत मिळाल्या!’

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

“पुढची पाच वर्षे नरेंद्र मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाणार”

मुस्लिम समाजातील जातीयवादाशी लढा देण्याची गरज

यावेळी पालिकेच्या विविध विभागांचे उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंत्यांशी अपूर्ण रस्ते पूर्ण करणे, खड्डे भरणे, गटारांची स्वच्छता, पाणी भरणारी ठिकाणे या पार्श्वभूमीवर करत असणाऱ्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यंदा पावसाळ्यात कुठेही पाणी भरू नये, नागरिकांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेऊन चोख आणि वेगात सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्याना केल्या. यावेळी विभागातील नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version