घरविशेषकाँग्रेस नेत्याच्या मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

काँग्रेस नेत्याच्या मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

बुधवारी (१३ नोव्हेंबर) एका थार एसयूव्हीने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने कर्नाटकातील उडीपी येथे एका ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कर्नाटक काँग्रेसचे नेते देवी प्रसाद शेट्टी यांचा मुलगा प्रज्वल शेट्टी हाच ही एसयूव्ही चालवत होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलला अटक करण्यात आली आहे.

ही घटना १३ नोव्हेंबरच्या पहाटे घडली. ३९ वर्षीय मोहम्मद हुसेन असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रज्वलने त्याच्या दुचाकीला त्याच्या थार एसयूव्हीने शिरवाजवळ धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. हुसैन यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दुसऱ्या दिवशी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा..

आरबीआयच्या कस्टमर केअरला धमकीचा कॉल

अभिनेत्री कस्तुरी शंकर यांना अटक

सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु!

शिरवा पोलिसांनी घटनेच्या दिवशीच एसयूव्ही जप्त केली. प्रज्वलला १४ नोव्हेंबरला ताब्यात घेण्यात आले; मात्र, त्यानंतर लगेचच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रज्वलचे वडील देवीप्रसाद शेट्टी हे उडुपी जिल्ह्यातील बेलापू गावातील काँग्रेसचे नेते आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version