घरविशेषमोदीजी तुम्ही इतके 'ग्लो' कसे काय करता?

मोदीजी तुम्ही इतके ‘ग्लो’ कसे काय करता?

क्रिकेटपटू हरलीनने विचारलेल्या प्रश्नाची चर्चा

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघातील खेळाडूंना भेटून त्यांच्या अतुलनीय जिद्द आणि पुनरागमनासाठी अभिनंदन केले. या भेटीत पंतप्रधानांना एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला — त्यांचा स्किनकेअर रुटीन काय आहे? त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कशामुळे आहे असा प्रश्न हरलीन देओल या खेळाडूने केला आणि सगळेच खेळाडू पंतप्रधान मोदींच्या उत्तराबद्दल उत्सुक होते.

हा प्रश्न आघाडीची फलंदाज हरलीन देओलने विचारला. ती म्हणाली, “मोदीजी खूप ग्लो करता, आपला स्किनकेअर रुटीन काय आहे?” संपूर्ण खोलीत हास्याचा फवारा उडाला.

यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी या गोष्टीबद्दल फार विचार केला नाही.

भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकला त्यानंतर हे सगळे खेळाडू पंतप्रधान मोदींना भेटले. ही भेट बुधवार झाली असून, याचा व्हिडिओ गुरुवारी प्रसारित झाला. ऑलराउंडर स्नेह राणाने तत्परतेने उत्तर दिले, देशातील लोकांचे प्रेमच त्यांना हा ग्लो देते. यावर मोदी हसत म्हणाले, “होय, नक्कीच. हे प्रेम माझ्यासाठी मोठी ताकद आहे. मी अनेक वर्षे शासनात घालवली आहेत. २५ वर्षे मी सरकारचा प्रमुख म्हणून काम केले आहे. या सगळ्यांनंतरही मिळणाऱ्या आशिर्वादांचा परिणाम शरीरावर दिसतोच.”

मोदींनी सोशल मीडियावर लिहिले, “भारताच्या महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचा प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान आहे. संघाशी संवाद साधताना खूप आनंद झाला.”

हे ही वाचा:

“वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त टपाल तिकिट, नाणे प्रकाशित

गोराई- दहिसर मॅन्ग्रोव्ह पार्क – “उत्तर मुंबई ते उत्तम मुंबई” संकल्पनेला गती

रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; गाड्या रखडल्या, ट्रॅकवर उतरून चालणाऱ्या दोघांचा मृत्यू

लाइफस्टाइल बदला, वजन आपोआप कमी होईल

भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक पराक्रम

रविवारी भारतीय महिला संघाने नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकला. ५२ धावांनी मिळवलेला हा विजय भारतीय महिलांच्या क्रिकेट इतिहासातील मैलाचा दगड मानला जात आहे. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर हा ऐतिहासिक क्षण साकार झाला.

या भेटीत कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “२०१७ मध्ये आपण आम्हाला भेटलात तेव्हा आमच्याकडे ट्रॉफी नव्हती. पण यावेळी जे आपण अनेक वर्षे जिद्दीने साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो, ती ट्रॉफी आम्ही आपल्या देशासाठी आणली हे आमच्यासाठी मोठे सन्मानाचे आहे. त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला पुन्हा पुन्हा आपणास भेटून आपल्यासोबत फोटो काढायचे आहेत. २०१७ च्या अंतिम सामन्यात भारत इंग्लंडकडून अवघ्या ९ धावांनी हरला होता. त्या पराभवानंतरही संघाने पंतप्रधानांची भेट घेतली होती.

क्रिकेट भारताचे जीवन : मोदी

पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही अप्रतिम काम केले आहे. भारतात क्रिकेट फक्त खेळ नाही, तर देशाच्या भावनांचे प्रतिक आहे. क्रिकेटमध्ये चांगले घडले की देश आनंदी होतो, आणि जरी थोडे चुकले तरी संपूर्ण भारत दु:खी होतो.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version