घरविशेषइतर देशांवर असलेले अवलंबित्व हाच आपला शत्रू!

इतर देशांवर असलेले अवलंबित्व हाच आपला शत्रू!

पंतप्रधान मोदींनी दिला आत्मनिर्भरतेवर भर

- Advertisement -

भारताचा खरा शत्रू म्हणजे इतर देशांवरील असलेले अवलंबित्व आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून केले आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भरता यावर भर दिला आहे. राष्ट्रीय सामर्थ्य आणि जागतिक आदर सुनिश्चित करण्यासाठी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

“जगात आपला कोणताही मोठा शत्रू नाही. आपला एकमेव खरा शत्रू म्हणजे इतर देशांवरील आपले अवलंबित्व. हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि एकत्रितपणे आपण भारताच्या या शत्रूला, अवलंबित्वाच्या शत्रूला पराभूत केले पाहिजे,” असा निर्धार नरेंद्र मोदी यांनी भावनगरमधील त्यांच्या जाहीर भाषणात बोलून दाखवला आहे. पुढे ते म्हणाले की, परकीय अवलंबित्व जितके जास्त असेल तितके राष्ट्राचे अपयश जास्त असेल. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाने आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सुचवले.

स्वावलंबनाची भावना जागृत करत नरेंद्र मोदींनी म्हटले की, “जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो तर आपला स्वाभिमान दुखावला जाईल. आपण १.४ अब्ज देशवासीयांचे भविष्य इतरांवर सोडू शकत नाही. भारत आपल्या विकासासाठी इतरांवर अवलंबून राहू शकत नाही किंवा येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य धोक्यात घालू शकत नाही. शंभर दुःखांवर एकच औषध आहे आणि ते म्हणजे स्वावलंबी भारत.”

हे ही वाचा : 

आय लव्ह मोहम्मद”ची रील बनवणाऱ्याला चौकशीसाठी बोलावताच पोलिसांवर दगडफेक

ट्रक चालक अपहरण प्रकरणी खेडकर कुटुंबियांच्या ड्रायव्हरला अटक

बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक

एच-१ बी व्हिसासाठी मोजावे लागणार १ लाख डॉलर्स! ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

दरम्यान, अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमध्ये नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य आल्याने याकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे. शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २१ सप्टेंबरपासून एच-१ बी व्हिसा अर्जांवर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. यामुळे याचा सर्वाधिक फटका हा भारताला याचा बसण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, भारतीय आयातीवर अमेरिकेने लादलेल्या ५०% च्या मोठ्या शुल्कापासून अद्याप कोणतीही सवलत मिळालेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे स्वावलंबी बनण्याचे आवाहन अधिक गांभीर्याने घेतले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version