घरविशेषजपानमध्ये प्रदर्शित होणार ‘धुरंधर’

जपानमध्ये प्रदर्शित होणार ‘धुरंधर’

चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

- Advertisement -

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिवेंज’ या चित्रपटांनी आधीच बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडले आहेत. जागतिक कमाईच्या बाबतीतही हे चित्रपट यशस्वी घोडदौड करत आहेत. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिवेंज’ या दोन्ही चित्रपटांना भारतात तसेच परदेशात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘धुरंधर’ ७ जुलै रोजी जपानमध्ये रिलीज होणार आहे.

जिओ स्टुडिओने ‘धुरंधर’चा जपानी पोस्टर शेअर करत रिलीजची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरनुसार, हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. मात्र, जपानमध्ये आधीच अनेक भारतीय चित्रपटांनी चांगली कमाई केली असल्याने ‘धुरंधर’समोर मोठे आव्हान असणार आहे.

राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट असून त्याने २.४२ अब्ज येन (सुमारे १३६ कोटी रुपये) कमावले आहेत. हा विक्रम अद्याप कोणत्याही चित्रपटाने मोडलेला नाही. ‘दंगल’ने चीनमध्ये प्रचंड कमाई केली असली, तरी जपानमध्येही सिनेमाने चांगली कमाई केली होती. वेगळ्या जपानी नावाने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुमारे १२.४० दशलक्ष येन (अंदाजे ७३.४८ लाख रुपये) कमावले होते.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या फाल्टा येथील संयुक्त ब्लॉक विकास अधिकाऱ्याची बदली

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानचे मालेगाव आणि मलेशियाशी संबंध

मंगळुरू कुकर ब्लास्ट प्रकरणात मोहम्मद शारिकला १० वर्षांची शिक्षा

यूएईने OPEC सोडल्याने भारताला काय फायदा?

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपटही जपानमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने सुमारे १.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच, आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’ आणि प्रभासचा ‘सालार’ या चित्रपटांनीही जपानमध्ये चांगली कमाई केली होती. कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘लापता लेडीज’ने सुमारे २.७५ कोटी रुपये कमावले, तर ‘सालार’ने ९५ लाख रुपयांहून अधिक कमाई केली होती. तसेच आता ‘धुरंधर’ या चित्रपटाला जपानमध्ये कसा प्रतिसाद मिळणार याकडे लक्ष असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version