घरविशेषमतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!

मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!

नांदेड मधील घटना

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज देशभरात सुरु आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा रक्षक, पोलीस दल लक्ष ठेवून आहे.काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत.दरम्यान, नांदेड मध्ये एक विचित्र घटना घडली आहे.एका व्यक्तीने मतदान केंद्रावरील ईव्हीएममशीन चक्क कुऱ्हाडीने फोडले आहे.

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली.भय्यासाहेब एडके असे ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या तरुणाचे आहे.मतदान केंद्रावर त्याने आपल्या सोबत कुऱ्हाड आणली होती.मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्रवेश करताच त्याने ईव्हीएममशीन वर कुऱ्हाडीचा घाव घातला.यामध्ये ईव्हीएम मशीनचे दोन तुकडे झाले.

हे ही वाचा:

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयीन कोठडीत वाढ!

उद्धव ठाकरे म्हणतात, यंदा ‘पंजा’ला मी करणार पहिल्यांदा मतदान

या घटनेनंतर मतदान केंद्रावरील पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले.या अशा विचित्र प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र, या तरुणाने असे कृत्य का केले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version