घरविशेषचोरीच्या भीतीने चक्क क्रेनने एसयूव्ही घराच्या छतावर चढवली

चोरीच्या भीतीने चक्क क्रेनने एसयूव्ही घराच्या छतावर चढवली

बिहारमधील व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

चोरीच्या भीतीपोटी एका व्यक्तीने आपल्या नव्या एसयूव्ही कारच्या सुरक्षेसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. बिहारमधील गोपालगंज येथे एका व्यक्तीने चक्क क्रेनच्या साहाय्याने आपली नवी कार दोन मजली घराच्या छतावर चढवली. या अनोख्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार मालक मनोज यादव हे परदेशात काम करतात. त्यांनी नुकतीच महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक ही एसयूव्ही खरेदी केली होती. मात्र, काही काळासाठी परदेशात जाणार असल्याने नव्या कारच्या सुरक्षेची चिंता त्यांच्या कुटुंबीयांना होती. चोरी होण्याच्या भीतीमुळे कार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हा आगळावेगळा उपाय शोधला. यानंतर एका मोठ्या क्रेनच्या मदतीने एसयूव्ही जमिनीवरून उचलून थेट दोन मजली घराच्या छतावर ठेवण्यात आली. कार छतावर नेण्याच्या या प्रक्रियेचा व्हिडिओ स्थानिकांनी चित्रित केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

सहारनपूरमध्ये पाडलेल्या मशिदीखाली २० फूट खोल विहीर

डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची चमक फिकी; चांदीही घसरली

समाजशास्त्र-मानववंशशास्त्र क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक शोभिता जैन यांचे निधन

एमपीएससी पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

मात्र, या प्रकारामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी घराच्या छताची कारचे वजन पेलण्याची क्षमता किती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एसयूव्हीचे मोठे वजन लक्षात घेता छताच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. चोरीपासून कारचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या या अनोख्या उपायाने आता इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली असून, अनेकांनी या ‘रूफटॉप पार्किंग’ची भन्नाट कल्पना म्हणून दखल घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version