माध्यमांचे जग हे धावते जग, घडामोडींचे जग. काही वर्षांपूर्वी एक अघटीत घडले होते. एका वर्तमानपत्राने अग्रलेख मागे घेतला होता. कधी कोणी विचारही केला नसेल अशी ही घटना. अशा घटना अलिकडे अपवादात्मक राहिलेल्या नाहीत. त्याच परंपरेतील एक बातमी सूत्रांकडून समजते. एका वृत्तसमुहाने वर्तमानपत्राचा अंकच मागे घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील एक वृत्तसमुह. तिथे गेल्या आठवड्यात बुधवारी घडलेली ही घटना. वर्तमानपत्राच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामाची धामधुम सुरू आहे. वर्तमानपत्राची डाक एडीशन काढण्याची घाई. कारण ही एडीशन छपाईसाठी सर्वात आधी पाठवावी लागते. अंक तयार झाला. प्रेसमध्ये छापून आला. अंकात काही तरी खास, काही तरी स्फोटक होते. प्रेसमधून अंकाचे गठ्ठे गाड्यांमध्ये भरले गेले. डाक एडीशनचा अंक घेऊन गाड्या रवानाही झाल्या. अचानक वर्तमान पत्राच्या कार्यालयात एकाच्या लक्षात आले. अंकात असे काही आहे, जे छापून आले तर खळबळ तर माजेल, परंतु यावेळी कदाचित ती पचणार नाही. कदाचित बुडाशी येईल. दुकानाला कायमचे टाळे लागले. लगेचच फोनाफोनी सुरू झाली. निर्णय झाला. वर्तमानपत्राच्या इतिहासातील दुसरा क्रांतिकारी निर्णय.
हे ही वाचा:
मध्य रेल्वेची स्वच्छता मोहीम जोरात!
राणीनं डाव जिंकला…सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पॅनल २१-०
जुनी मतदार यादी, हातावरच्या गोंदणामुळे २४ वर्षांनी सापडली हरवलेली बहीण
जंतर मंतरमध्ये घुसलेल्या ‘कॉक्रोच’ना घेतले ताब्यात
अंकाचे गठ्ठे घेऊन गेल्या वाहनांच्या चालकांना फोन गेले. थांबा, आहात तिथून परत या. वाहन चालकांना काही कळे ना. पण काय करणार बापडे. मागे फिरले. एक अख्खा अंक मागे घेण्यात आला. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घेऊन इथे तिथे जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली. काही होते त्या अंकात हे कदाचित कधीही समोर येणार नाही. परंतु बिनबुडाच्या बातम्या देणारे आता पूर्वी सारखे बिनधास्त राहीलेले नाहीत, हे स्पष्ट करणारी ही घटना आहे, हे निश्चित.
