घरविशेषदिल्ली-नोएडामध्ये पूराचा कहर

दिल्ली-नोएडामध्ये पूराचा कहर

- Advertisement -

यमुना नदीच्या जलस्तरात सातत्याने वाढ होत असल्याने दिल्ली आणि एनसीआर परिसरातील अनेक भागांत पाणी शिरले असून खालच्या भागांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ‘आप’ कार्यकर्त्यांना प्रभावित भागांत मदत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले, “दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे अनेक खालच्या भागांत पाणी साचले आहे. मी ‘आप’च्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, प्रशासनासोबत मिळून मदत व बचाव कार्यात सहभागी व्हा आणि प्रत्येक गरजवंतापर्यंत मदत पोहोचवा.”

दिल्लीलगतच्या नोएडामध्येही यमुनेच्या प्रचंड प्रवाहामुळे खालच्या भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. हजारो लोकांना आपली घरे सोडून उघड्यावर आसरा घ्यावा लागत आहे. दरम्यान, स्थानिकांनी प्रशासनावर मदत व बचाव कार्यात निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. स्थानिक रहिवासी अमित गौतम यांनी सांगितले, “आत्ता जशी परिस्थिती आहे, तशीच स्थिती २०२३ मध्येही आली होती. पूरामुळे आमच्या गावाची परिस्थिती बिकट होत चालली आहे, पण प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. प्रभावित लोकांनी आपली घरे सोडली असून आता सर्वजण पुश्ता रोडवर राहतात.”

हेही वाचा..

‘अजेय’चा ट्रेलर प्रदर्शित

आग्रा: ५०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर, परदेशातून निधी, ८ जणांना अटक!

दहशतवादाविरुद्ध एकजुट होऊन लढणे हे सर्व मानवतावादी राष्ट्रांचे कर्तव्य

इंटरनेट सब्स्क्राइबर्सची संख्या १०० कोटींवर

इतर एका रहिवाशाने सांगितले की, “आमच्या गावातील परिस्थिती सतत खराब होत आहे आणि आतापर्यंत प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. या पुरामुळे आमची पिके देखील उद्ध्वस्त झाली आहेत. जर यमुना नदीची पातळी अशीच वाढत राहिली तर पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होईल.” स्थानिक रहिवासी रजनी म्हणाल्या की, “आमच्या गावात पूराचे पाणी आले असून त्यामुळे आम्हाला घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. आम्हाला प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा होती, पण त्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version