घरविशेषगौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी त्यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गौतम अदानी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना पुण्यातील रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी गौतम अदानी यांनी रुग्णालयात पोहोचून पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय नेते आणि मान्यवर रुग्णालयात भेट देत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांची भेट घेतली होती.

हे ही वाचा : 

पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

जैश संबंधित संशयिताला दिल्लीतून अटक

इटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!

बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version