घरविशेषविविध नेत्यांकडून होळीच्या शुभेच्छा

विविध नेत्यांकडून होळीच्या शुभेच्छा

रविवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात होळीचे दहन करण्यात आले आणि आज धुळवड साजरी केली जात आहे. महराष्ट्रात ठाकरे सरकारच्या होळी साजरी न करण्याच्या आदेशांना हरताळ फासत जनतेने मोठ्या प्रमाणात होळी आणि धुळवड साजरी करायला सुरूवात केली आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

मुंबईत वाढले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, तर महाराष्ट्राचा आकडा चाळीस हजार पार

भारताने केली मालिका विजयाची हॅट्रिक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये, “होळीच्या शुभ दिनी सर्व देशवासियांना शुभेच्छा. रंगाचा उत्सव असलेली होळी, सामाजिक सौहार्दाचे प्रतिक आहे आणि यामुळे लोकांत आनंद, उत्साह आणि आशा निर्माण होतो. उत्साह आणि उल्हासाचा हा दिवस आपल्या सांस्कृतिक विविधतेत असलेल्या राष्ट्रीय चेतनेला अधिक शक्ती प्रदान करो अशी माझी प्रार्थना आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटर वरून सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, आणि आनंद, उत्साह यांचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात जोश घेवून येवो अशी प्रार्थना देखील केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अशाच प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version