नवी दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतिकात्मक संसदेत महाभियोगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या या प्रतिकात्मक संसदेवर घणाघाती टीका केली.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत ते कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा केला. संबित पात्रा म्हणाले, “तुम्ही तुमची बनावट संसद चालवा किंवा मोर्चे काढा; मात्र संपूर्ण जगाला आता हे समजले आहे की राहुल गांधी यांच्यात कोणतीही क्षमता नाही. हे ‘सॅटेलाइट’ कधीही प्रक्षेपित होणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, विरोधकांना राहुल गांधी यांना आयुष्यभर आपले ‘बनावट पंतप्रधान’ म्हणून ठेवायचे असेल, तर त्यांनी तसे जरूर करावे. संबित पात्रा यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला. विरोधकांकडून करण्यात येणारे ‘मतचोरी’चे आरोपही त्यांनी फेटाळून लावले. उलट, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे मत चोरून पंतप्रधानपद मिळवले होते, असा दावा पात्रा यांनी केला.
हे ही वाचा:
ऍड. संजीव पुनाळेकर यांना मातृशोक
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!
लोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक
बाथरुममध्ये पडून दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
या कार्यक्रमावर उपरोधिक टीका करताना पात्रा यांनी विरोधकांना त्यांची ‘मॉक संसद’ बंद करू नका, असा टोला लगावला. राहुल गांधी यांना कुर्ता-पायजमा घालून विरोधकांच्या बाकांऐवजी सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसवावे आणि त्यांच्या सभोवताली आघाडीच्या नेत्यांनी ‘पंतप्रधान, पंतप्रधान’ अशा घोषणा द्याव्यात, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले.
दरम्यान, इंडी आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधकांच्या कार्यक्रमावर केलेल्या टीकेमुळे राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पात्रा यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडी आघाडीने आयोजित केलेल्या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमाचा उल्लेख ‘मॉक संसद’ अर्थात बनावट संसद असा केला. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे देशाच्या वास्तविक संसदेचा अनादर असल्याचे ते म्हणाले.
